|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » महामेळाव्यातून परतताना भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

महामेळाव्यातून परतताना भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नागपूर :

भाजपच्या स्थपना दिवसानिमित्त मुंबईत काल महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थिता झाले होते. मात्र या कार्यक्रमाहून परतणाऱया भाजप कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये हार्ट ऍटक ने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

नवनीत बेहरे हे नागपुरातील प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप अध्यक्ष होते. नागपूरहूनन भाजपच्या स्पेशल टेनने गुरुवारी ते मुंबईला आले होते. सुमारे 24 तासांच्या प्रवासानंतर सुरत मार्गे ही टेन शुक्रवारी दुपारी मुंबईला पोहचली होती. मध्यरात्री सुमारास मुंबईहून टेन परत नागपूरसाठी निघाली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास टेन डहाणूजवळ असताना नवनीत बेहरे यांना चालत्या टेनमध्ये हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

 

नवनीत बेहरे असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्यांचा मृतदेह डहाणूला उतरवून टेन नागपूरला रवाना झाली. उत्तरीय तपासणी आणि इतर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बेहरे यांचा मृतदेह नागपूरला नेला जाणार आहे.

 

 

 

 

 

Related posts: