|Monday, March 30, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. शुक्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्याचा योग्य पद्धतीने विस्तार करता येईल. परिस्थितीचा नीट अभ्यास करा. तुमची मते सांगा. पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका. पुढे सर्व तुमच्याच हातात येतील. धंद्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. संसारातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात संयमाने वागा. संधीची वाट पहाणे योग्य असते.


वृषभ

मेषेत सूर्य प्रवेश व सूर्य-गुरु षडाष्टक योग होत आहे. या सप्ताहात तुम्ही जास्त मेहनत करून महत्त्वाची कामे करण्याची तयारी ठेवा. रविवारी तणाव व वाद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या बरोबर रहा. हेकेखोरपणा करू नका. धंद्यात  कामाकडे लक्ष ठेवा. तसेच कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. जास्त तणाव करू नका. संसारात वडील माणसांचा सल्ला घ्या. मुले व सहचारिणी बरोबर किरकोळ तणाव होईल.


मिथुन

मिथुनेच्या एकादशात सूर्य प्रवेश व शुक्र, मंगळ त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणीवर मात करावी लागेल. बेफिकीरी वृत्तीने वागू नका. आपसात गैरसमज करून दिला जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढवता येईल. तसा प्रयत्न करा. धंद्यात वाढ करता येईल. परदेशात माल पाठवून पैसा व नाव कमवता येईल. नोकरी लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती होईल.


कर्क

कर्केच्या दशमात सूर्य प्रवेश व चंद्र-बुध युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. त्यांचे विचार ऐकावयास मिळतील. गुरुवार, शुक्रवार तुम्ही संताप करून घेऊ नका. मनाविरुद्ध निर्णय होऊ शकतो. प्रवासात घाई नको. वाटाघाटीत मोठा वाद होऊ शकतो. एकमेकांच्या जिवावर उठण्याचा प्रयत्न होऊ शकतो. धंद्यात सुधारणा होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवे काम मिळेल. कोर्टकेसमध्ये मदत घेता येईल.


सिंह

मेषेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. ठरविलेला कार्यक्रम मनाप्रमाणे पूर्ण होईलच असे नाही. संताप होईल. तुमच्यावर एखादा आरोप राजकीय, सामाजिक क्षेत्रात होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या मनात कलह निर्माण करून देण्याचा प्रयत्न गुप्तशत्रू करतील. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. आहे तो धंदा सांभाळा. संसारात मुले व सहचर तुमच्याबरोबर असतील.


कन्या

मेषेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. तुमच्या अधिकारात वाढ होईल. परंतु सहनशीलता ठेवा. आरोप प्रत्यारोप तुमच्यावर होऊ शकतात. योग्य व्यक्तींचा सहवास ठेवा व सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक विभागात बुधवार, गुरुवार, विरोधकांचा त्रास होईल. वाकडे वळण प्रसंगाला देऊ नका. धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळख झालेल्या माणसाबरोबर एकदम मनातील विचार व्यक्त करू नका.


तुळ

तुळेच्या सप्तमस्थानात सूर्य प्रवेश व शुक्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. जीवनसाथीच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुम्हाला नोकरीचा कॉल येऊ शकतो, प्रयत्न करा. संसारातील कामे जबाबदारीने पूर्ण करावी लागतील. राजकीय- सामाजिक  क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. शनिवारी परस्पर विरोधी घटना घडण्याची शक्मयता आहे. क्रीडा कला, क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन परिचय प्रेरणा देईल.


वृश्चिक

या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. तुम्ही महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. मेषेत सूर्य प्रवेश, शुक्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अस्थिरता राहील. जास्त धाडस शेअर्समध्ये करू नये. राजकीय, सामाजिक कार्याची जबाबदारीने पूर्तता करावी. अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या. शेजारी तुम्हाला विरोध करण्याची शक्मयता आहे. संसारातील कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी धावपळ करावी लागेल.


धनु

ताण-तणाव सर्व ठिकाणी होता तो कमी होऊ शकतो. साडेसाती सुरू आहे. मेषेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. घरातील कामे पूर्ण करू शकाल. धंद्यात सुधारणा व फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्याला नव्या पद्धतीचे वळण देता येईल. लोकांच्या उपयुक्ततेसाठी उपक्रम करता येतील. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. प्रयत्न करा. केस संपवा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक व पैसा मिळेल.


मकर

मेषेत सूर्य प्रवेश व शुक्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुम्हाला तुमचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळेल. रविवारी संतापजनक घटना घडू शकते. साडेसाती चालू आहे. मारामारी सारखे प्रसंग टाळा. व्यसनाने त्रास होईल. धंद्यात वाढ होईल. नवे परिचय होतील. कला, क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. दौरा करताना प्रवासात घाई नको. संसारात सर्वजण असूनही एकटेपणाची भावना मनात येऊ शकते.


कुंभ

कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल. मेषेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. सोमवार, मंगळवार तुमच्यावर अनाठायी आरोप केला जाईल. तुमची प्रति÷ा वाढेल.लोकांच्या सोयीचे कार्य करा. वरवर दिसणारे सुखाचे वातावरण जगात पसरले आहे. प्रत्यक्षात मात्र सर्वच त्रस्त आहेत. शेतकरी वर्गाला फायदा होईल. नवा प्रयोग यशस्वी होईल. पुरस्कार व लाभ मिळेल.


मीन

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. मेषेत सूर्य प्रवेश व शुक्र -मंगळ त्रिकोण योग होत आहे. तुमची प्रगती सर्वांच्या डोक्मयात भरणारी असेल. त्यामुळे मनातून चडफडणारे लोक गुरुवार, शुक्रवार अडचणी निर्माण करतील. सहनशीलता ठेवा. अहंकार नको. दिखाऊपणा न करता कामधंदा करत रहा. कला, क्रीडा क्षेत्रात मोठी संधी मिळेल. नवे परिचय होतील.

Related posts: