|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » किनारी भागात अतिरेकी हल्ल्याची शक्यता

किनारी भागात अतिरेकी हल्ल्याची शक्यता 

सरकारकडून शॅकमालक, लाईफ गार्डसह संबंधितांना सतर्क राहण्याचे आदेश

प्रतिनिधी/ पणजी

किनारी भागात अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आता राज्य सरकारही त्याबाबत सतर्क झाले आहे. त्यामुळे किनारी भागातील शॅकमालक, लाईफ गार्ड आणि अन्य संबंधितांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याबरोबर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनीही आवश्यक त्या सूचना केल्याचे स्पष्ट केले आहे.

किनारी भागात ट्रॉलरमधून किंवा अन्य मार्गाने अतिरेकी येण्याची शक्यता वर्तविल्याने त्याबाबत आता दक्षता बाळगली जात आहे. इंटेलिजन्सकडून तशा प्रकारची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे आता सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. बार्ज मालकही याबाबत गस्ती ठेवून आहेत. पर्यटन खात्यानेही आता जीवरक्षक सेवा उपलब्ध करणाऱयांना तसेच शॅकमालकांना दक्षता घेण्याची सूचना केली आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ माहिती देण्याची सूचना केली आहे. शुक्रवारी या संदर्भात कॅसिनो ऑपरेटर तसेच अन्य जलवाहतूक करणाऱया बोटींना दक्षता घेण्याची सूचना केली होती.

Related posts: