|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » शिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार

शिवसैनिकांची हत्या ; हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र : अजित पवार 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

‘अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

पवार हे सातऱयातील एका कार्यक्रमात बोलत होते. दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी अटक झाली आहे. तर त्यांचे वडील अरूण जगताप यांच्याविरोधत हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा, ती जबाबादारी पोलिसांची आहे. फोन तपासा, कुठे सुई जाते ते तपासा. या सगळय़ा तपासात संग्रामचा कुठेही यत्किंचितही संबंध नाही, हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचा आमदार म्हणून बदनामी करण्याचं काम चाललेलं आहे. संशयाच्या भोवऱयामध्ये त्यांना अडकवण्याचं काम सुरु आहे.