|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वेबसाईट्स औषध खरेदी हवी कशाला?

वेबसाईट्स औषध खरेदी हवी कशाला? 

अडचणीत असलेल्या रुग्णांना सोयीची औषध खरेदीच आता अडचणीची ठरत आहे. वेबसाईटवर डिजिटल प्रिक्रिप्शन अपलोड करून सुरू असलेली औषध खरेदी रुग्णहक्काची पायमल्ली तर होतेच; शिवाय रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, असे अन्न व औषध विभागच सांगतो. एका औषध खरेदीवर दुसरे औषध मोफत हा जाहिरातीचाच फंडा असू शकतो. मग सोयीची वाटणारी वेबसाईटवरील औषध खरेदी हवीच कशाला ?

 

अजिथ्रोमायसिन ही गोळी प्रतिजैविक असून ती पोटाचा वरील भाग म्हणजे श्वसननलिका, घसा, कान, नाक यात त्रास उद्भवल्यास दिली जाते. आता अजिथ्रोमायसिन गोळीची मात्रा कामच करत नसल्याचे डॉक्टर सांगतात. सतत चुकीच्या पद्धतीने गोळी घेतल्याने 80 टक्के लोकांवर या गोळीचा परिणाम साधत नाही. याला कारण औषध घेण्याची पद्धत चुकीची असते. अजिथ्रोमायसिन ही गोळी जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर घेणे योग्य असते. कोणतेही औषध घेण्याची योग्य पद्धत एकतर डॉक्टर सांगतो, नाही तर साक्षर औषध विक्रेता. त्यामुळेच डॉक्टरांनंतर औषध विक्रेता महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येक औषध विक्रेत्याने औषध घेण्याची पद्धत सांगणे बंधनकारक आहे. तसे तो करतोही. मात्र, औषध ग्ा्रहण करण्याची पद्धत सांगणारा औषध विक्रता हा दुवाच ऑनलाईन औषध विक्री पद्धतीमुळे बाजूला सारला जात आहे. ऑनलाईन औषध विक्री अनेक रुग्णांच्या अंगाशी बेतत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. गेल्या तीन-चार वर्षापासून ऑनलाईन औषध विक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले. तक्रारींनंतर  राज्याच्या अन्न व औषध विभागाने गेल्याच आठवडय़ात ऑनलाईन औषध विक्री करणाऱया वेबसाईट्स तसेच कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू केली.

ऑनलाईन औषध विक्री करताना दोष आढळून आले. या बाबी रुग्णहितासाठी गंभीर असल्याचे ऑल फूड ऍण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचे अभय पांडे सांगतात. कधी कधी रुग्णांना विना प्रिक्रिप्शन तर कधी विना बिल औषध पुरवठा केला जातो. प्रिक्रिप्शन दिलेले नसतानाही ऑनलाईन औषधविक्री करणाऱया कंपन्यांकडून डिजिटल प्रिक्रिप्शनचा आधार घेऊन औषधविक्री केली असल्याचे निदर्शनास आले आहे. डिजिटल प्रिक्रिप्शन वेबसाईटवर अपलोड केल्यावर औषध घरपोच मिळते. त्यामुळे रुग्णही ऑनलाईन औषध खरेदी करतात. मात्र, यात बऱयाच त्रुटी आहेत. बऱयाच वेळा डिजिटल प्रिक्रिप्शन देणारे डॉक्टर्स हे दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसणे, डॉक्टरांची नावे बनावट असणे, ऑनलाईन फार्मसीद्वारे वेबसाईटना देण्यात येणाऱया चिट्ठीवरील वैद्यकीय व्यावसायिक हे खरोखर नोंदणीकृत व्यावसायिक आहेत का, हे तपासले न जाणे या बाबीही अन्न व औषध विभाग अधिकाऱयांच्या ध्यानात आले आहे. तर बऱयाचवेळा औषध प्रिक्रिप्शनसाठी सोशल मीडियाचादेखील वापर करण्यात येत असतो.
ऑनलाईन औषध विक्री करणारी वेबसाईट सोशल मीडियाचा आधार घेत दुसऱया उत्पादनाची जाहिरात देखील करत असते. मात्र, अशा औषधांच्या दर्जाबाबत खात्री देण्यास कोणीच समोर येत नाही. बऱयाच अंशी अशा औषधांचे उत्पादन ठिकाण ठाऊकच होत नाही. यावर सरकारचे नियंत्रण प्रभावी नसते. औषधनिर्मिती करणारी कंपनीची नोंद नसल्यास कारवाई करणारी सरकारी यंत्रणाही गोंधळात पडते. त्यामुळे अशा बनावट औषधांपासून किंवा मुदतबाह्य औषधांपासून ग्ा्राहकाला धोका असतो. तसेच, अशा उत्पादकांची नोंदच सरकार दरबारी नसल्याने विनापरवाना उत्पादन औषधात भेसळ असण्याची मोठी शक्यता असते. ऑनलाईन औषध खरेदीतील त्रुटींचा रुग्णांवर मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम होत आहे.  वेबसाईटवर ऑर्डर करून घरबसल्या औषधे मिळत असल्याने साईट्सवरून औषध विक्रीचा व्यवसाय तेजीत असतो. शिवाय अशा वेबसाईटवरून औषधाची मागणी केल्यास त्या औषधाच्या जवळील उत्पादनाची जाहिरात करून मोफत पुरवठादेखील करण्यात येतो. जसे गर्भनिरोधक गोळ्य़ांची
ऑनलाईन मागणी केल्यावर सोबत मसाज ऑईल आणि वायग्रा ही कामोत्तेजक गोळी मोफत दिली जाते. मोफत मिळते म्हणून खरेदी करणारे ग्राहक मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, त्या मसाज ऑईलचा किंवा वायग्रा गोळीचा डोस सहन करण्याइतपत ग्राहकाचे वय किंवा शारीरिक क्षमतेबाबत डॉक्टर किंवा केमिस्टच सांगू शकतात. ते मार्गदर्शन वेबसाईटवरून मिळत नाही. शिवाय या मोफत मिळणाऱया औषधांची विश्वासार्हता कमी असल्याने ग्राहकाच्या जीवावर देखील बेतत असल्याचे
डॉक्टर सांगतात. तर, एखाद्या लहान मुलाला
ऍन्टीबॉयोटिक दिल्यानंतर त्याने त्वरित ते औषध उलटी केल्यास लगेच दुसरा डोस आपण देऊ शकतो. मात्र, ऍन्टीबॉयोटिक दिल्यानंतर उलटी करण्याचा कालावधी तासाभराचा असल्यास दुसरा डोस देऊ नये, असा उपदेश डॉक्टर
उपलब्ध नसल्यास फक्त औषध विक्रेताच देऊ शकतो. औषध दुष्परिणामाविरोधात जाब विचारण्याचे कायमस्वरुपी ठिकाण या उत्पादन कंपन्यांचे नसते. याला कारण वेबसाईट्सवरून औषध विक्री करणाऱया कंपन्या बाहेरील राज्यातील असल्याचेही ध्यानात आले आहे. अशावेळी राज्याबाहेरील आस्थापनांविरोधात कारवाई करण्यास बंधन पडत असल्याचे अन्न व औषध विभागाचे अधिकारी सांगतात. तरीही औषध नियंत्रकांशी संपर्क साधून कारवाई सुरू असल्याची खात्रीदेखील विभागाकडून देण्यात येत आहे. तसेच, अशा पद्धतीने खरेदी केलेली औषधे बऱयाच प्रमाणात बनावट असण्याची शक्यता असते. कारण औषधाचे मूळ मॉलिक्युएल उत्पादन करणाऱया औषधांचा दर न परवडणारा असतो. त्यामुळे त्याच स्वरुपातील बनावट औषध निर्मिती करून वेब साईटवरून विक्री करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे रोखण्यासाठी सर्व औषध निरीक्षक यांना अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ऑनलाईन फार्मसी औषध विक्री ऑर्डर देऊन कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन औषध विक्रीसाठी रोज रोज नवनवीन वेबसाईट्स येत आहेत. त्यावर कारवाई करणे प्रशासनाचे काम आहे.  रुग्णांना औषध विक्रेत्यांकडून औषधाची माहिती, औषध घेण्याची पद्धती सांगणे गरजेचे आहे. अशी माहिती
ऑनलाईन फार्मसी प्रक्रियेमध्ये दिली जात नाही. अशी औषधे मिळत असल्याने रुग्णांना स्वत: उपचार करून घेण्याची प्रवफत्ती वाढते. त्यामुळे औषधाचा तर्कशुद्ध वापर होत नाही व त्याचा परिणाम जंतुची प्रतिकारशक्ती वाढविण्यात होतो. असा जंतूसंसर्ग भविष्यात कोणत्याही औषधाला दाद देणारा ठरत नाही. यांचे परिणाम भविष्यात दिसून येणारा असल्याची भीती आतापासूनच व्यक्त होत आहे.