|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कार अपघातात चालक गंभीर

कार अपघातात चालक गंभीर 

निपाणी राष्ट्रीय महामार्गावरील घटना : टायर फुटल्याने कार तीनवेळा पलटी

वार्ताहर/ निपाणी

भरधाव वेगाने जात असताना कारचे टायर फुटल्याने कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तीस छाप बिडी कारखान्याजवळ ही घटना घडली. नारायण नायक (वय 38 रा. घटप्रभा) असे जखमी चालकाचे नाव आहे.

अपघाताबाबत समजलेली अधिक माहिती अशी, कारचालक नारायण हे आपली कार स्विफ्ट डिझायर (जीए 06 डी 6686) घेऊन गोव्याहून कोल्हापूरकडे जात होते. दरम्यान तीस छाप बिडी कारखान्यानजीक येताच कारचे टायर फुटले. त्यामुळे नारायण यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार भरधाव वेगाने जात महामार्गावरील दुभाजकाला धडकली.

वेगाने दुभाजकाला धडकल्याने कार तीनवेळा उलटली. यामध्ये कार महामार्गालगत असणाऱया झाडांमध्ये जाऊन पडली. यात कारचा चक्काचूर झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुंजलॉईडचे सचिन हुक्केरी व कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.

Related posts: