|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » अहमदनगर हत्याकांड ; 600 शिवसैनिकांवर गुन्हे

अहमदनगर हत्याकांड ; 600 शिवसैनिकांवर गुन्हे 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर अहमदनगरमध्ये 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हत्याकांडानंतर दगडफेक, रस्ता रोको, शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा यासह अनेक गंभीर गुन्हे शिवसैनिकांवर दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह शहरप्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाऱयांसह तब्बल 600 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

 

शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मोठय़ प्रमाणात दगडफेक झाली होती. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली होती. त्याचबरोबर मारेकऱयांच्या अटकेसाठी मृतदेह घटनास्थळीच ठेऊन रस्तारोको केला होता. रुग्णवाहिकाही थांबून ठेवल्याने तीन तासांपेक्षा जास्त वेळ मृतदेह घटनास्थळीच होते. पोलिसांना पंचनामाही करण्यास विरोध करण्यात आला होता.