|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद उभा करा!

सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद उभा करा! 

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांचे आवाहन : कणकवली सत्यशोधक व्याख्यानमालेचे उद्घाटन

प्रतिनिधी / कणकवली:

सांस्कृतिक राष्ट्रवाद जातीधर्मांची, समाजातील अनिष्ठ प्रथांची परंपरा जोपासतो, तोच राष्ट्रवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि त्यांच्या सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना हवा आहे. त्यांच्या विचाराच्या संघटना हेच काम करण्यासाठी आता कार्यरत झाल्या आहेत. यासाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद उभारण्यासाठी माणूस म्हणून जगू पाहणाऱया सगळय़ांनीच संघटीत व्हावे, असे आवाहन संविधानचे अभ्यासक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे आयोजित सत्यशोधक व्याख्यानमालेतीलभारतीय संविधान आजची आव्हाने आणि सामाजिक समतेच्या लढय़ाची दिशाविषयावर पहिले पुष्प गुंफताना केले.

समता प्रति÷ान सिंधुदुर्ग सत्यशोधक चळवळीतर्फे दरवषी आयोजित करण्यात येणाऱया सत्यशोधक व्याख्यानमालेचे उद्घाटन येथे डॉ. कसबे यांच्या हस्ते झाले. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानात डॉ. कसबे यांनी मोदी सरकारच्या काळात स्त्राrयांना कुठलेही हक्क द्यायचे नाहीत, जाती, धर्मात बदल करायचा नाही ही मानसिकता बनविली जात असल्याचा आरोपही केला. सत्यशोधक जनआंदोलनाचे राज्याध्यक्ष कॉ. किशोर जाधव, . भा. विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पार्थ पोकळे, देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि. . सभापती शारदा कांबळे, संस्थेचे अध्यक्ष अमोल कांबळे, सचिव योगेश सकपाळ, अंकुश कदम आदी उपस्थित होते.

डॉ. कसबे म्हणाले, भारतीय संविधानात प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. पण जे परंपरावादी, जातधर्मवादी सरकार सत्तेवर येते. ते इथल्या व्यक्तीव्यक्तीचे स्वातंत्र्यच नाकारण्याचे काम करीत असते. मोदी सरकार हेच काम करीत असून आज स्त्राrयांना कुठलेही हक्क द्यायचे नाहीत, जातीधर्मात बदल करायचा नाही ही मानसिकता बनवली जात आहे. आपल्या देशात राज्य कोण करतं, याला महत्त्व नव्हतं, तर संस्कृती टिकेल, यालाच महत्व दिलं गेलं. म्हणूनच इंग्रजांनी भारतभर पाय रोवले. पण इंग्रजांनी कायद्यासमोर सगळी माणसं समान असतात हे धोरण अवलंबिलं म्हणूनच इंग्रजांना ब्राह्मणांचा विरोध होता. मोदी सत्तेवर आल्यावर देश शाकाहारी बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा मनुस्मृती जपण्याचा प्रयत्न आहे. असं घडविणारे वेदांचेच पाठिराखे असतात. पण वेदांमध्ये काहीच तत्वज्ञान नाही. आपल्याकडे उपनिषदांतूनच तत्वज्ञानाला सुरुवात होते. हे उपनिषद बहुजनांनीच लिहिले. ब्राह्मणांनी नाही. प्रबोधनाच्या चळवळीतून माणूस केंद्रस्थानी असायला पाहिजे हा विचार आपल्याकडे रुजला आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात उभं राहायचं असेल, तर हाच प्रबोधनाचा विचार घेऊन संघटीत व्हावं लागेल.

बहुजन मुलांना आपण वेदात काय आहे हे सांगितलं नाही, धर्म चिकित्सा आपण केली नाही, संतांचे विचार आपण आत्मसात केले नाहीत. म्हणूनच बहुजनांची मुले संघ आणि मोदींच्या मागून धावत गेली. कबीर म्हणतो, वेद म्हणजे आंधळय़ाच्या समोर धरलेला आरसा आहे. आपल्या देशात नामदेव हा भारतीय भक्ती चळवळीचा नेता होता. नामदेवांचे अभंग ऐकताना आपण रंगून जातो. हीच गोष्ट मीराबाईंमध्ये आहे. पण मीराबाईंचा विचार आपण समजूनच घेतला नाही. मीरा एकतारी वाजवून अठरापगड संतांबरोबर नाचली. हा तिचा केवढा तरी मोठा विद्रोह होता. हा सगळा समतेचा विचार या मोदी सरकारला बदलायचा आहे. म्हणूनच त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवाद जपायचा आहे. त्यातूनच हळूहळू राज्यघटना त्यांना बदलायची आहे, हे सगळे बहुजनांनी हाणून पाडायला हवे. नाहीतर असे राजकारण करणारे राष्ट्रापेक्षा मोठे होतात आणि त्यातून राष्ट्र कोसळून पडते हा धोकाही विचारात घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारताची पायाभरणी नेहरुंनी केली पण त्यांचे नाव मोदी घेत नाहीत. ते भारताबाहेर मात्र गांधी, आंबेडकर यांचेच नाव घेतात. कारण त्यांच्या गोळवलकर यांना बाहेरच्या जगात कोणच ओळखत नाही. आज संपूर्ण देश अराजकाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिथेजिथे आता दंगली होतात, तिथेतिथे राजकीय अड्डे बनलेले आहेत. म्हणूनच आता सगळय़ांनी सगळय़ांचा विचार करण्याची गरज आहे. आता माणसं मारण्याची हत्यारं स्वतः झाली असून यासाठीच सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उद्घाटन सत्रात शारदा कांबळे, जयप्रकाश परब यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन जीतेंद्र पेडणेकर यांनी, प्रास्ताविक योगेश सपकाळ यांनी, तर स्वागत अमोल कांबळी यांनी केले. परिचय अंकुश कदम यांनी करून दिला.

म्हणूनच कसबे यांना निमंत्रण

महाराष्ट्रात संघाला जागा दाखवून देण्याचं काम डॉ. रावसाहेब कसबे यांनी केलं. आंबेडकर, मार्क्सवादाचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. डॉ. कसबे हे राज्यातील असे एकमेव विचावंत, की त्यांनी आंबेडकरवादाचीही चिकित्सा केली. म्हणूनच आंबेडकर विचार त्यांनी खऱया अर्थाने पोहोचविला असल्यानेच त्यांना या व्याख्यानासाठी निमंत्रित केले असल्याचे अंकुश कदम यांनी सांगितले.

Related posts: