|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खड्डय़ात सापडली दीड लाखाची अवैध दारू

खड्डय़ात सापडली दीड लाखाची अवैध दारू 

पोयरेमशवी येथील घटनाः संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी / देवगड:

पोयरे मशवी येथील रस्त्यानजीकच्या खड्डय़ात पालापोचाळय़ामध्ये लपवून ठेवलेली सुमारे दीड लाख किंमतीची गोवा बनावटीची अवैध दारू देवगड पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई सोमवारी सकाळी सात वा. च्या सुमारास करण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोयरे मशवीवाडी येथील रस्त्यानजीकच्या खड्डय़ात अवैध दारुसाठा केल्याची माहिती देवगड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक जी. बी. वारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर पानसरे, पोलीस हवालदार एस. डी. कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी पोलिसांना रस्त्यानजीकच खड्डय़ामध्ये पाचापाचोळय़ात लपवून ठेवलेली गोवा बनावटीची एक लाख 57 हजार 920 रुपये किंमतीची अवैध दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारू जप्त केली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पानसरे करीत आहेत.

Related posts: