|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रभाग रचनेवर आज सुनावणी

प्रभाग रचनेवर आज सुनावणी 

प्रतिनिधी/सांगली

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर दाखल हरकतींवर आज सुनावणी होणार आहे. येथील माधवनगर रोडवरील सर्किट हाऊस येथे सकाळी दहापासून सुनावणीला सुरूवात होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता यातील दुसरा टप्पा यावर सूचना आणि हरकती दाखल करण्याचा होता, 27 मार्च ते सहा एप्रिलपर्यंत दरम्यान 62 हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सांगली 50, कुपवाड आणि मिरज प्रत्येकी 6 हरकतींचा समावेश आहे.

या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी पी. अनबगलन सदस्य, सचिव, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ मुंबई, मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हधिकारी यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. हरकतींवर निवडणूक आयोग 23 रोजी निर्णय देणार आहे. ज्यांनी हरकती दाखल केल्या आहेत, अशांनी वेळेत उपस्थित राहावे असेही आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts: