|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पीआरसीने केल्या शिक्षण अन् आरोग्य विभागाच्या चिंध्या

पीआरसीने केल्या शिक्षण अन् आरोग्य विभागाच्या चिंध्या 

 

प्रतिनिधी/ सातारा

जिह्याच्या तपासणीला आलेल्या पंचायत राज समितीची पाच पथके केली असून त्यातील एका पथकाने सातारा पंचायत समितीची दुपारी तब्बल दोन तास तपासणी केली. या तपासणीमध्ये आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागास विचारलेल्या प्रश्नांमध्ये समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने तत्कालीन अधिकाऱयांसह विद्यमान अधिकाऱयांच्या अक्षरशः चिंध्याच केल्या. बुकलेटमध्ये मोघम आकडे फुगवून भरले आहेत. ते व्यवस्थित त्रुटी दूर करुन सकाळी 10 वाजेपर्यंत आणून द्या, अशा शेलक्या शब्दात भारत भालके आणि ऍड. दिलीप सोपल यांनी पाणउतारा केला. विचारलेल्या 28 प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱयांना चांगला दरदरुन घाम फुटत होता.

सातारा पंचायत समितीला भेट देण्यामध्ये पीआरसीचा गट 2 होता. त्यामध्ये गटप्रमुख ऍड. दिलीप सोपल, भारत भालके, राहुल बोंद्रे, तुकाराम कोते, अव्वर सचिव प्रकाशचंद्र खेंदले, उपसचिव ए. बी. रिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जावेद शेख, संजय सोनावणे यांचे आगमन कोरेगावहून दुपारी पावणेतीनच्या सुमारास पंचायत समितीत झाले. पंचायत समितीतील महिलांनी त्या समितीचे औक्षण करुन स्वागत केले. तसेच आमदार शिवेंद्रराजे भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी श्रीमती अमिता गाढवे यांनी स्वागत केले. त्यानंतर सभागृहात गेल्यानंतर पुन्हा सातारी सत्कार करण्यात आला. सभागृहातून इतरांना बाहेर काढल्यानंतर पीआरसीच्या सदस्यांनी प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी सत्य प्रकरण सांगावे, कुठली त्रुटी राहिली असेल, ती स्पष्ट सांगावी अशी सूचना देत समाजकल्याण विभागाची 2018 मध्ये रक्कम शिल्लक आहे ती सांगा, बीडीओ गाढवे यांनी 4 लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. वाढीव कर स्वरुपात किती रक्कम मिळाली त्यावर 6 लाख प्राप्त झाली आहे. अनुदान 3 मार्च 2018 रोजी मंजूर झाले. प्रत्यक्ष अनुदान 23 मार्चला मिळाले, असे सांगताच, दिलीप सोपल यांनी नियोजन केलं का?, अधिकाऱयांचे नियोजन का नाही. नियोजन केले असते तर निधी खर्च झाला असता. अशा शब्दात तासले. मुख्य लेखा परीक्षकांमार्फत पंचायत समितीची तपासणी केली आहे का? या प्रश्नाची तपासणी केली असून त्यांनी सूचना केल्यानुसार मार्गदर्शन मागवले आहे. तसेच आपल्या उत्पन्नांतून योजना हाती घेतल्या. या प्रश्नाबाबत छेडले असता 7 योजना व 12 विकासकामे केल्याचे उत्तर दिले. प्राथमिक आरोग्यकेंद्रांना किती वेळा भेटी दिल्या, असा प्रश्न केला. त्यावर पाच वेळा भेटी दिल्याचे सांगितले. किती उपककेंद्र?, असा प्रश्न छेडला असता 8 प्राथमिक आरोग्य केंद्र, 45 उपकेंद्र आहेत. त्यांना भेटी दिल्याचे सांगितले. शाळांची संख्या जादा आहे. किती मुलं आजारी आढळली? या प्रश्नावर 260 हा आकडा सांगताच आकडेवारी फुगवल्यासारखी वाटते. हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त कसे?, असाही प्रश्न छेडला असता कण्हेर आणि नागठाणे आरोग्य केंद्राच्या हद्दीत 99 टक्के मुलींचे प्रमाण असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. हजार मुलांच्या तपासणीत 250 मुलं गैरहजर कशी?, 36 मुलांमध्ये दोष आढळून आला आहे, त्यावर उपचार का नाही झाला, ही मुलं शाळेत आहेत का?, काय परिस्थिती आहे? एका मुलीचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण?, 1934 मुलांमध्ये मुख्य आजार आहे का?, असे प्रश्न विचारल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कारखानिस यांची चांगलीच तंतरली. शिक्षण विभागाच्या आढाव्या दरम्यान, 2013-14 किती शाळांना विस्तार अधिकारी यांनी भेटी दिल्या? असा प्रश्न छेडला असता, आकडेवारीत घोळ आढळून आला. शिक्षण गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांनी उत्तर देत असताना त्यांना भालके यांनी रोखत तत्कालीन आलेत का?, पदभार कोणाकडे होता. चार गटशिक्षणाधिकाऱयांनाही प्रश्न विचारत किती भेटी दिल्या? यावरुन संशय वाढला. गरीबांची मुलं शिकतात. काहीच केलं नाही तर मुलांच नुकसान झालं असणार, चार्ट कोणी केला, बुकलेटमध्ये आकडे असेच रेटले आहेत का?, हे रेकॉर्डवरुन केले की मोघम, उद्या बुकलेटमधील त्रुटी दूर करुन सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेत भेटा. अशा शब्दात त्यांनी कान उपटले. त्यानंतर पटपडताळी, ऑडीट यावरुनही चांगलेच ताशेरे ओढले.

शिवाजीनगर शाळेचे कौतुक (12एसएटीए23)

ज्ञानरचनावाद आहे तरी कसा? हे पाहण्यासाठी चक्क पीआरसीच्या एका गटाने शिवाजीनगर शाळेला भेट  दिली. केलेल्या कामांवरुन त्यांनी विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांची इन्क्रीमेंट वाढवली, तसेच तेथील शिक्षकांचीही इन्क्रीमेंट वाढवली असल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होवू लागला आहे.

Related posts: