|Monday, September 16, 2019
You are here: Home » leadingnews » राष्ट्रकुल’मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य

राष्ट्रकुल’मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य 

ऑनलाईन टीम / सिडनी  :

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

एकूण 56 मिनिट चाललेल्या या सामन्यात सायनाने पी.व्ही. सिंधूचा थेट पराभव केला. सायनाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. तिने 8-4 ची आघाडी मिळवत सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही. पण तरीही सिंधूनेही प्रयत्नांची पराकाष्टा करत 18-20 असा स्कोर केला. पण पुढच्याच क्षणात सायनाने एक गुण मिळवत 21-18 असा अशी आघाडी मिळवली.

तर दुसऱ्या डावात सिंधूने पुनरागमन करत 7-5 अशी आघाडी मिळवली. पण सायनाने खेळ पलटत 8-10 असा स्कोर केला. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोघींनीही 20-20 असे समसमान गुण मिळवले होते. पण पुढील काही क्षणातच सायनाने बाजू पलटत, पी.व्ही सिंधूचा पराभव केला.