|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘रणांगण’चित्रपटातून प्रणाली घोगरेची मराठीत एन्ट्री

‘रणांगण’चित्रपटातून प्रणाली घोगरेची मराठीत एन्ट्री 

आपण कधीतरी चित्रपटात दिसावं हे स्वप्न उराशी बाळगून कित्येक अभिनेत्री आपल्या कारकिर्दीची सुरुवात करतात. काहींची स्वप्नं पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात तर काही आपल्या रोजच्या जीवनात मग्न असताना आयुष्याला एक सुंदर वळण आपसूकच मिळून जातं. काहीशी अशीच गोष्ट आहे ‘रणांगण’ चित्रपटातून मराठी सिनेसफष्टीत पदार्पण करणाऱया प्रणाली घोगरेची…

अभिनयक्षेत्राची फारशी ओळख नसताना प्रणाली अचानक या अभिनयक्षेत्राशी जोडली गेली आणि क्षेत्राचीच होऊन गेली. राजश्री प्रोडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या या अभिनेत्रीने निखिल अडवानींच्या ‘गुड्डू इंजिनीयर’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं. त्यानंतर मंचुकुरीसी वेल्लालो या तेलगू चित्रपटातून ही मराठमोळी अभिनेत्री साऊथमध्ये दिसली. आता ही रणांगण चित्रपटातून आपल्या मराठी पदार्पणाला सज्ज झाली आहे. आपल्या पदार्पणातच प्रणालीला सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सुचित्रा बांदेकर, आनंद इंगळे, सिध्दार्थ चांदेकरसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे प्रणाली भलतीच आनंदात आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला थोडंसं दडपण आलं होतं. मात्र, या सगळय़ांबरोबर काम करताना आपण नवीन असल्याची जाणीव त्यांनी कधीही न करुन दिल्याचं तिने स्पष्ट केलं. या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी उत्सुकता ताणून धरत 11 मे ला प्रदर्शित होणाऱया रणांगण चित्रपटातून ती स्पष्ट होईल असे प्रणालीने म्हटलं आहे. प्रेक्षकांना संभ्रमात टाकणाऱया या चित्रपटाची निर्मिती 52 विक्स एंटरटेनमेंट आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मीडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचे निर्माते करिष्मा जैन आणि जो राजन आहेत. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे आणि राकेश सारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून हा चित्रपट 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related posts: