|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर 

लखनौः

उत्तरप्रदेशच्या 13 विधान परिषद जागांसाठी होणाऱया निवडणुकीकरता भाजपने रविवारी उमेदवार जाहीर केले आहेत. महेंद्र सिंग, मोहसीन रझा, बुक्कल नवाब, विद्यासागर सोनकर आणि अशोक कटारिया यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. बिहारच्या तीन विधान परिषद जागांसाठी देखील भाजपने स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत.

निवडणूक आयागाने उत्तरप्रदेशातील विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 5 मे रोजी संपुष्टात येणार आहे. यात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा देखील समावेश आहे. निवडणूक तसेच मतमोजणी 26 एप्रिल रोजी होणार आहे.

विधान परिषदेत सध्या समाजवादी पक्षाचे 61, बसपचे 9 आणि भाजपचे 13 तर काँग्रेसचे 2 सदस्य आहेत. रिक्त होणाऱया जागांपैकी सपच्या 7, भाजप तसेच बसपच्या प्रत्येकी 2 आणि रालोदच्या एका जागेचा समावेश आहे. अंबिका चौधरी यांनी राजीनामा दिल्याने एक जागा अगोदरपासूनच रिक्त आहे.

Related posts: