|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वाभिमानीचा महावितरणवर मोर्चा

स्वाभिमानीचा महावितरणवर मोर्चा 

वार्ताहर/ उदगाव
उदगांव-चिंचवाड ता.शिरोळ येथील शेतीची वीज आठवडयातुन तीन-तीन दिवस खंडीत होत असल्याने रविवारी दूपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येवून उदगांव येथील महावितरणच्या सब स्टेशनवर कार्यालयाच्या सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी तात्काळ वीज पुरवठा करावा, अशी मागणी करत महावितरणच्या अधिकाऱयांना घेराव घालून खंडीत केलेली वीज दररोज भरुन काढून व सर्व कामे तात्काळ दुरुस्ती करावीत, असे सांगितले. त्यानंतर महावितरणने आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
मागील आठवडय़ात तीन दिवस तर या आठवडय़ातील शुक्रवार, शनिवार व रविवारही तीन दिवस वीज खंडीत केल्याने संपातलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यानी जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती व स्वाभिमानेचे नेते सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उदगांवच्या महावितरणच्या सब स्टेशनवर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कनि÷ अभियंता शंशिकांत माने यांने यांना शेतकऱयांनी जाब विचारला, यावेळी महावितरण विघुत कामात तांत्रिक अडचण वीज पुरवठा खंडीत असल्याचे सांगितले. त्यानंतर वरी÷ कार्यकारी अभियंता एम. डी. आवळेकर यांना बोलावून शेतकऱयांनी प्रश्न विचारले. तसेच उदगांव-चिंचवाडमध्ये गाव व शेतीला वीज पुरवठा केला जातो. त्यामध्येच उदगांव औद्योगिक वसाहतीलाही वीज दिली जाते. काही अचडण निर्माण झाल्यास फक्त शेतीची वीज खंडीत केली जाते. यापुढे असे झाल्यास औद्योगिक वसाहतीची वीज तोडु असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणला दिला आहे.
अखेर कार्यकारी अभियंता एम. डी. आवळेकर व कनि÷ अभियंता शशिकांत माने यांनी महावितरणकडील तांत्रिक अडचणी सोमवारपर्यत पूर्ण करुन घेतल्यानंतर रीतसर वीज पुरवठा केला जाईल. तसेच गेल्या सहा दिवसातील 48 तास खंडीत झालेली वीज दररोज दोन ते तीन तास वाढवुन दिले जाईल असे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी प्रा. राजाराम वरेकर, मनोहर पुजारी, प्रकाश बंडगर, प्रमोद चौगुले, दिलीप गुरव, श्रेणिक मादनाईक, दत्ता पुजारी, कुमार गोधडे, सुरेश मगदुम, गुंडा कोरे, हिमाम जमादार, संजय घाटगे, सुनिल निर्मळ, आप्पासो घाटगे, बाळु माने, अशोक बंडगर, अरुण गोधडे, मच्छिद्रं गोधडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Related posts: