|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एकच उमेदवार द्या : येळ्ळूर विभाग म. ए. समिती बैठकीत ठराव

एकच उमेदवार द्या : येळ्ळूर विभाग म. ए. समिती बैठकीत ठराव 

प्रतिनिधी / बेळगाव

गेली 60 वर्षे येथील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तेव्हा म. ए. समितीने प्रत्येक मतदार क्षेत्रामध्ये एकच उमेदवार द्यावा, आणि त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ठराव येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ता. पं. सदस्य रावजी पाटील होते.

येळ्ळूर, धामणे, मच्छे या परिसरात म. ए. समितीचे अधिक वर्चस्व आहे. असे असताना तालुका म. ए. समितीमध्ये सदस्य मोठय़ा प्रमाणात घेतले जात नाहीत. यामुळे आमच्यावर एकप्रकारे अन्याय होत आहे. तरीदेखील आम्ही मध्यवर्ती म. ए. समितीने दिलेल्या आदेशांचे पालन करत आलो आहे. यापुढेही आम्ही एकीनेच म. ए. समितीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणणार आहे. तेव्हा दक्षिण क्षेत्रामध्ये एकच उमेदवार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी एल. आय. पाटील, प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, प्रदीप मुरकुटे, उदय जाधव, ग्रा. पं. सदस्य राजू पावले, अजित पाटील, यासह शिवाजी कदम, एम. वाय. घाडी, परशराम घाडी, गोपाळ घाडी, शांताराम कुगजी, यांच्यासह अनेक ग्रा. पं. सदस्य व नागरिक उपस्थित होते.