|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले : राहुल गांधी

मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचश वाटोळे केल्याची घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. देशात काही राज्यात निर्माण झालेल्या चलन तुटवडय़ावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

नीरव मोदी 30 हजार कोटी रूपये घेऊन देशातून पळून गेला. पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. आमचे पंतप्रधान संसदेत उभे राहण्यास घाबरतात. आम्हाला भाषणासाठी 15 मिनिटे द्या, मग पंतप्रधान संसदेत कधीच उभे राहू शकणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मोदींना आव्हान दिले.राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱयावर आहेत. त्यावेळी माध्यमांनी त्यांनी देशातील चलन तुटवड्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर अत्यंत आक्रमकपणे त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला केला. पंतप्रधान संसदेत उभे राहण्यास घाबरतात. आम्हाला भाषणासाठी फक्त 15 मिनिटं मिळायला हवीत मग पाहा पंतप्रधान संसदेत कधीच उभे राहू शकणार नाहीत. मग ते राफेलचे प्रकरण असो किंवा नीरव मोदीचे प्रकरण पंतप्रधान उभेच राहू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

 

Related posts: