|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात लवकरच दुहेरी इंजिनच्या सोलर फेरीबोटी

राज्यात लवकरच दुहेरी इंजिनच्या सोलर फेरीबोटी 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील जलमार्गावर केरळच्या धर्तीवर सोलर फेरीबोटी सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्या दुहेरी इंजिनच्या फेरीबोटी वर्षभरात आणण्याचा इरादा नदी परिवहनमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. गोव्यातील नद्याच्या ताबा व देखरेख राज्य सरकारकडेच राहणार असून त्यातील पाण्याचे राष्ट्रीयीकरण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे 3 कोटी खर्चुन नवीन तीन फेरीबोटींचा शुभारंभ ढवळीकर यांच्याहस्ते पणजीतील फेरीधक्क्यावर झाला. यावेळी ते बोलत होते. पणजी ते बेती, आगापूर ते मळार व वाडी ते तळावली या तीन मार्गावर या नवीन फेरीबोटी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने या नवीन फेरीबोटी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाली आहे, असे ते म्हणाले.

मांडवी नदीसह गोव्यातील इतर काही नद्यांमधील गाळ काढण्याची योजना आखण्यात आली असून ते 200 कोटींचे काम असल्याची माहिती त्यांनी दिली. तसे आश्वासन केंदीयमंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे ते म्हणाले. नद्यांचे राष्ट्रीयीकरण होणार नसून त्यातील पाण्याचे राष्ट्रीयीकरण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नद्यांचा ताबा गोव्याकडेच राहणार आहे. पाण्यातील गाळ उपसणे व इतर अनेक कामे केंदाकडून करून घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. केरळ राज्यात 85 आसनांच्या सोलर फेरीबोटी चालतात. अशा फेरीबोटी गोव्यात सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Related posts: