|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » प्रश्न विचारल्यावर राज्यपालांनी महिला पत्रकाराचे गाल थोपटल्याने खळबळ

प्रश्न विचारल्यावर राज्यपालांनी महिला पत्रकाराचे गाल थोपटल्याने खळबळ 

ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूच्या राज्यपालांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी महिला पत्रकाराचे गाल थोपटल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱया सेक्स फॉर डिग्री प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान महिला पत्रकारने विचरलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी गाल थोपटले.

सेक्स फॉर डिग्री प्रकरणामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी ’ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आणि याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्याने तामिळनाडूत एकच खळबळ उडाली. त्यामुळेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी 78 वषीय राज्यपाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या लक्ष्मी सुब्रमण्यम या महिला पत्रकराने प्रश्न विचारला.

 

पण प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाल थोपटले. राजभवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता.लक्ष्मी सुब्रमण्यम ‘द वीक’मध्ये काम करतात. या घटनेनंतर लक्ष्मी यांनी ट्वटि करुन “मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले’’, असे म्हटले