|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » युटिलिटी वाहनांत मारुती सुझुकीचे वर्चस्व

युटिलिटी वाहनांत मारुती सुझुकीचे वर्चस्व 

नवी दिल्ली

 2017-18 मध्ये युटिलिटी वाहनांच्या विक्रीमध्ये प्रथम स्थान पटकाविल्याचे मारुती सुझुकी इंडियाकडून सांगण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा हिस्सा 27.5 टक्क्यांवर पोहोचला. व्हितारा बेझा, एर्तिगा, एस क्रॉस या मॉडेलच्या विक्रीमध्ये समाधानकारक वृद्धी दिसून आली.  कंपनीच्या या तीन मॉडेल्सच्या विक्रीमध्ये 29.6 टक्क्यांनी वाढ होत 1,95,741 युनिट्सवरून 2,53,759 वर पोहोचली. युटिलिटी वाहन प्रकारातील आपला हिस्सा मजबूत करण्यासाठी कंपनीकडून भर देण्यात येत आहे. व्हितारा बेझाच्या विक्रीत 36.7 टक्के आणि एस क्रॉसच्या विक्रीत 44.4 टक्क्यांनी वाढ झाली.

Related posts: