|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » यंदा पाऊस सर्वसाधाराण , भेंडवळची भविष्यवाणी

यंदा पाऊस सर्वसाधाराण , भेंडवळची भविष्यवाणी 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :
शेतकऱयांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल असे भाकित भेंडवळच्या भविष्यावाणीतून करण्यात आले आहे. बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली आहे.

अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असेल. देशाच्या आर्थिक तिजोरीत वाढ होईल. यंदा पाण्याची टंचाई राहणार नाही. देशाचा राजा कायम राहील. कुठलाही धोका नाही तर शत्रूपासून देश सुरक्षित असेल देशाचे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील, अशा प्रकारचे भाकीत वर्तविले गेले आहे. भाकीत ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. जून महिन्यात सार्वत्रिक पाऊस येणार नाही, तर सर्वत्र पेरणीही होणार नाही. जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल राहिलेली पेरणी शेतकरी आटोपेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात साधारण स्वरूपाचा पाऊस पडेल. ज्या भागात जास्त पाऊस तेथे जास्त शेती-पिके चांगली येतील तर ज्या भागात कमी पाऊस तेथे पिक परिस्थिती साधारण राहील. असेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. यापूर्वी हवामान खात्यानेही चांगला पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता