|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचा आदेश

दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचा आदेश 

नवी दिल्ली

 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारला सदर कारवाई करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमची आई अमीना आणि बहिण हसीना पारकर यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.

1988 मध्ये सरकारने कायद्याअंतर्गत तस्करी, परदेशी चलन घोटाळा करणारे आणि त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती जप्त केली होती. दाऊदच्या बहिण आणि आईने संपत्ती जप्त करण्याला न्यायालयात आव्हान दिले होते. 1993 साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभांगांनी त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली होती. दाऊदच्या मुंबईतील संपत्तीची किंमत हजारो कोटींमध्ये असण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागपाडामध्ये दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती हसीना आणि अमीना यांच्या नावावर आहे. दाऊदने बेकायदेशीरपणे ही संपत्ती गोळा केली होती अशा माहिती तपास यंत्रणांनी दिली होती, ज्या आधारे हसीना आणि अमीना यांची याचिका फेटाळण्यात आली. यापूर्वी हसीना आणि अमीना यांची याचिका लवाद आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता दाऊद आणि त्याचे नातेवाईक यांची मालमत्ता ताब्यात घेऊन तिची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

Related posts: