|Friday, December 6, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

चंद्र, गुरु त्रिकोण योग व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. सहकारी व नेते मंडळींना तुमची मते पटवून दिली तरी त्यांच्या विचारांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल. गुप्त शत्रू किरकोळ अडचणी निर्माण करतील. धंद्यात सप्ताहाच्या शेवटी समस्या येऊ शकते. बोलताना व करार करताना सावध रहा. घरातील लोकांची मदत मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेत यश मिळेल.


वृषभ

तुमचा उत्साह व आत्मविश्वास उपयोगी ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात सर्वांच्या सहमतीनेच वागा. धंद्यात अरेरावी उपयोगी पडणार नाही. गोड बोलून नवे काम मिळवता येईल. कोर्टकेसमध्ये स्वत:च्या हिमतीवर बोला. मदत मिळणे कठीण होईल. घरातील वाद मिटवता येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरि÷ांना दुखवू नका. कायद्याच्या विरोधात न जाता काम करा. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी.


मिथुन

तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. आळस करू  नका. राजकीय- सामाजिक कार्यात योजना गतिमान करा. प्रति÷ा मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. काम करा. धंद्यासाठी मोठे कंत्राट मिळेल. संसारात खर्च वाढेल. शुभ समारंभात हजर रहावे लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती व पैसा मिळेल. पुरस्कार मिळेल. नवीन मोठे परिश्रम होतील. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. अभ्यासात आळस करू नये.


कर्क

या सप्ताहात तुमचा प्रभाव राजकीय- सामाजिक कार्यास वाढेल. रविवार सर्वच ठिकाणी सावधपणे बोला. तुमचे स्पष्ट बोलणे कौतुकास्पद ठरेल. लोकप्रियता मिळेल. लोकांच्या सहकार्यासाठी चांगले प्रयत्न करा. धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा वाढेल. शेअर्स अंदाज घेता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. प्रगतीची संधी मिळेल. प्रत्येक दिवस तुम्हाला उत्साह देणारा असेल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये.


सिंह

सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्मयता आहे. ठरविलेले काम पुढे ढकलावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. डावपेच यशस्वी होतील. बोलताना थोडा विचार करा. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. क्रीडा, कला क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. संसारात शुभ घटना घडेल. प्रेमाला चालना मिळेल. शिक्षणात यश मिळेल. नोकरी मिळेल.


कन्या

व्यवसायात फायदा होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुम्ही कुठेही अतिशयोक्ती व अहंकार ठेऊन वागू नका. बुधवार, गुरुवार, कोर्टकेस, कायद्यासंबंधी कामात अडचणी येतील. वाद वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. प्रेमाला योग्य वळण देता येईल. विद्यार्थी वर्गाने शांतपणे व नम्रपणे वागावे. यश मिळेल.


तुळ

 सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. चर्चा करा. भेट घ्या. प्रति÷ित लोकांचा परिचय होईल. मान सन्मानाचा योग येईल. धंद्यात फायदा होईल. आर्थिक व्यवहारात शुक्रवार, शनिवार सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ तुमचे मत विचारात घेतील. जबाबदारी देतील. नोकरी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. नवीन मित्र परिवार मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. परीक्षेत यश मिळेल.


वृश्चिक

या आठवडय़ात तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रति÷ा मिळेल. महत्त्वाची कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यात टिकात्मक आरोप होतील. लोकांचे प्रेम व सहकार्य मिळेल. नोकरीत पदाधिकारी मिळेल. व्याप वाढेल. जमिन, घरा संबंधी कायदेशीर कामे करून घ्या. कला क्रीडा क्षेत्रात नवे मित्र मिळतील. नावलौकीक मिळेल. धंद्यात वाढ झाली तरी खर्चही होईल.


धनु

सप्ताहाच्या सुरुवातीला नातलगांच्याकडून निष्कारण मनस्ताप होईल. दगदग होईल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तुमचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संयमी भूमिका घ्यावी लागेल. मानसन्मान मिळेल. लोकांच्या मनात गैरसमज करून देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रेमात तणाव होईल. कोर्टकेसमध्ये मार्ग शोधता येईल. पदाधिकार नोकरी, राजकारण यामध्ये मिळु शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


मकर

संसारातील समस्या लवकर सोडवता येतील. यावर लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात स्वत:च्या मोठेपणाचा विचार न करता लोकांचा बाजूने विचार करण्याची वेळ येऊ शकते. वरि÷ तुमच्यावर एखाद्या निर्णयाबद्दल दबाव टाकण्याची शक्मयता. बुधवार, गुरुवार यादिवशी आहे. धंद्यात मोठे काम मिळावे, कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. परीक्षेत यश मिळू शकेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


कुंभ

या आठवडय़ात मानसिक दडपण येईल. तणावाचे प्रसंग येतील. त्यातून तुम्ही बाहेर पडाल. परंतु गुप्त शत्रू विरोधात जातील. निष्कारण गैरसमज करून देतील. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. धंद्यात सुधारणा होण्याची खबर मिळेल. आप्तेष्टांच्यासाठी धावपळ करावी लागेल. कोर्टकेस संबंधी कामात  अडचणी येतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. थकवा वाटू शकतो.


मीन

महत्त्वाची कामे करून घेता येतील.  बुधवार, गुरुवार शत्रुत्व वाढण्याची शक्मयता आहे. अहंकार ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ तुमचे कौतुक करतील. आर्थिक साहाय्य मिळेल. नवीन ओळखी होतील. मैत्री वाढेल. धंदा वाढेल. पैसा जपून ठेवा. शेअर्समध्ये फायदा होईल. परीक्षेसाठी कष्ट घेतल्यासच यश मिळेल. प्रेमाच्या नादी लागून वेळ घालवू नका.


 

Related posts: