|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अंगापूर येथील कुस्तीत पैलवान जगताप विजयी

अंगापूर येथील कुस्तीत पैलवान जगताप विजयी 

वार्ताहर/ देशमुखनगर

अंगापूर (ता. सातारा) येथील कुस्ती क्षेत्रात गावच्या नावलौकीकात ठोस कमगीर करण्यात यशस्वी एन. आय. एस. कोच जितेंद्र कणसे यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून तालीम संघ व ग्रामस्थांच्यावतीने कुस्त्यांचे  आयोजन केले होते.

 या कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विठ्ठल गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनंजय शेडगे, व्हा. चेअरमन राजेंद्र पाटील, रमेशराव कणसे, राजेंद्र कणसे, हणमंतराव कणसे, शिवाजीराव कणसे, माणिक चव्हाण, जयाशिंग कणसे, मंगेश कणसे, दिनकर कणसे, युवराज कणसे, राजेंद्र कणसे,  तसेच विविध पक्षातील व क्षेत्रातील मान्यवरांच्या  उपस्थित संपन्न झाले.

 मैदानात अनेक नेत्रदीपक कुस्त्या मल्लांनी केल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती पुण्याच्या गणेश जगताप विरुद्ध कोल्हापूर येथील मल्ल विजय धुमाळ यांच्यात झाली. यामुळे  पैलवान जगताप याने मोळी डावपेचावर  पैलवान धुमाळ याला चितपट केले. या कुस्तीत मैदानाला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ परिसरातील तसेच जिल्हातून कुस्तीशैकिनानी हजेरी लावली होती. शेकडो युवक आज त्यांच्या या कार्यामुळे विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत. नकळत अनेक कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपणारा व  मातीशी इमान  राखण्यासाठी सदैव तत्पर असणाऱया कणसे यांना ग्रामस्थांनी चांदीचा गदा व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related posts: