|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माजी मुख्यमंत्र्यांकडून जुन्या कोयना पुलाच्या कामाची पाहणी

माजी मुख्यमंत्र्यांकडून जुन्या कोयना पुलाच्या कामाची पाहणी 

प्रतिनिधी/ कराड

येथील जुन्या कोयना पुलाच्या मजबुतीकरणाच्या कामाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पाहणी केली. पुलाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा येईल असे सांगत चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पुलाच्या कामासंदर्भात सूचना केल्या.

कोयना नदीवर असलेला ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. इंग्लंडमधून भारत सरकारला या पुलाची वयोमर्यादा संपल्याचे पत्र पाठवण्यात आल्यानंतर पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद झाली. कराड शहर आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. वाहतूक बंद झाल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय वाढली होती.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाठपुरावा केला होता. मजबुतीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर झाल्यानंतर 25 मार्च 2018 पासून पुलावरून हलकी वाहतूकही बंद करण्यात आली. पुलाच्या मजबुतीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांकडून त्यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. मजबुतीकरणात संरक्षक कठडे कशा पद्धतीने करण्यात येतील याबाबत माहिती घेऊन त्यात चव्हाण यांनी बदल सुचवले. पुलावरून जास्तीत जास्त वजनाची वाहतूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, उपअभियंता विशेष प्रकल्प अधिकारी मानसिंग पाटील, शाखा अभियंता प्रमोद मोटे, कराड शहरचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव,  बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, राहुल चव्हाण, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, बाजार समितीचे माजी संचालक प्रतापराव देशमुख,  अजितराव पाटील-चिखलीकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, पै. तानाजी चवरे, गजानन आवळकर, उत्तमराव दशवंत, शिवाजी जमाले, दिलीपभाऊ चव्हाण, झाकीर पठाण, हिंदूराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Related posts: