|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आंबा महोत्सवामुळे दलाली हद्दपार होईल

आंबा महोत्सवामुळे दलाली हद्दपार होईल 

आंबा महोत्सवामुळे दलाली हद्दपार होईल

प्रतिनिधी/ सोलापूर

दलालामुळे बऱयाच वेळा आंबा उत्पादकाला योग्य भाव मिळत नाही. परंतु सोलापूरात भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये होणारी दलाली हद्दपार होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरातील होम मैदानावर आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशुमख हे होते. यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा उपनिबधंक अविनाश देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागांवकर, बाजार समितीचे सचिव मोहन निबांळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, राज्यातील सहकारी संस्था बळकट झाल्याशिवाय महाराष्ट्र बळकट होणार नाही. त्यासाठी राज्यातील पाच हजार सहकारी संस्था बळकटी करण्याचे काम चालू आहे. गावातील प्रत्येक सातबारा उतारा असलेल्या खातेदाराला विविध कार्यकारी सोसायटीचा सभासद करून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतीवरील खर्च कमी करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली अनेक प्रयोग राबविण्यात येत आहे. शेतकऱयांना अल्पदरात वीज, पाणी, खते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तसेच सोलापूरात देखील एक शेतकऱयांचे सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मंद्रुप येथील पाठ बंधाऱयांची जागा देण्याची मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी तर प्रस्ताविक कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले. आभार प्रदर्शन बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी मांडले. यावेळी अशोक गारडी, शहर उपनिबधंक कुंदन भोळे, महादेव गुंडे, दिलीप नाईक, भाजप जिल्हा सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, काशिनाथ कदम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, श्रीकांत बागल, केदार उंबरजे, प्रभुराज विभुते, सिध्दय्या स्वामी आदी उपस्थित होते.

————

Related posts: