|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्री शांतादुर्गा देवस्थानचा शिखर कलश प्रतिष्ठान सोहळा

श्री शांतादुर्गा देवस्थानचा शिखर कलश प्रतिष्ठान सोहळा 

वार्ताहर/ सावईवेरे

सातेरीभाट-वळवई येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या शिखर कलश प्रष्ठापना सोहळा कणेरी-कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठाचे प.पू. श्री मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराज यांच्याहस्ते भाविकांच्या अलोट गर्दीत अत्यंत भक्तीमय व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

सोहळय़ाची सुरूवात सकाळी 9 वा दिंडीसह भव्य मिरवणूकीने शिखर कलश मंदिरात आणण्यात आला. त्यानंतर 2.30 प.पू. मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराजाचे  विधीवत स्वागतानंतर भव्य मिरवणूकीने त्यांचे मंदिरात आगमन झाले. त्यांना आदरपुर्वक आसनावर बसवून सौ. व श्री. रूपाली वेशांत नाईक यांच्याहस्ते त्य़ाची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर ठिक 10.10 वा. त्याच्याहस्ते शिखर कलशाची स्थापना व विधीवत पूजन करण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत शिरले बांधा मठाचे स्वामी शंकरानंद सुक्केरी मठाचे स्वामी अभिनव मंजूनाथ, बांधकाम समितीचे अध्यक्ष सखाराम नाईक, सेवा समितीचे अध्यक्ष उल्हास नायक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश नाईक आदी उपस्थित होते.

शिखर कलशाची प्रतिष्ठापना सोहळय़ानंतर स्वामी महाराजांचे प्रवचन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देव आहेत त्यावर पाश्चात लोकांकडून टिका होते. यावर स्पष्टीकरण करताना  आपण आपल्या संस्कृतीत देवाची भक्ती मनोभावे करतात, देव आपल्या भक्ताच्या हाकेला धावतो हे आपल्या साधूसंतानी दाखवून दिले आहेत. जन्म देणाऱया आईला आम्ही माता मानतो त्याचप्रमाणे गायीला पवित्र मानून माता म्हणून पूजतो तिच्यात तेहतीस कोटी देव वास करत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. आई जशी आपली तशीच शांतादुर्गा ही सुद्धा माताच आहे. आज या देवीच्या भक्तानी सुंदर असे हे मंदिर उभारले आहे यातूनच भक्तांची भाविकांची इश्वरावर किती श्रद्धा, भक्ती आहे हे दिसून येते.

 आमचे शिष्य विवेक शेटय़े व त्याच्या सहकार्यामुळे या देवीच्या कळसाचे पूजन करण्याचे भाग्य मला लाभले असे सुचित केले व प्रत्येकाने आपले मन इश्वराप्रती स्वच्छ शुद्ध, पवित्र शांत ठेवावे असे आवाहन केले.

सर्वप्रथम सखाराम नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागतपर विचार मांडले. हिरू नाईक यानी परिचय करून दिला. यानंतर सर्व भक्तानी स्वामीचे आशिवर्चन घेतले. शेवटी महाप्रसादाने या शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळयाची सांगता झाली.

Related posts: