|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » जॉब सर्चसाठी गुगलचा पुढाकार

जॉब सर्चसाठी गुगलचा पुढाकार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था:

ऑनलाईन रोजगार शोधण्यासाठी गुगलकडून अधिकृतपणे सेवा सुरू करण्यात आली. गुगल सर्चवर ही सेवा उपलब्ध असून सुलभपणे रोजगारसंधीची माहिती शोधण्यास मदत होईल. यासाठी गुगलने काही रोजगारविषयक कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. मोबाईल फोन आणि डेस्कटॉपवर गुगल सर्चवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

गुगलने आसानजॉब्स, फेशर्सवर्ल्ड, हेडोन्चोस, आयबीएम केनेक्सा, लिंक्डइन, क्युझक्स, शाईन डॉट कॉम, विस्मडजॉब्स, टाईम्सजॉब्स यांच्याबरोबर भागीदारी केली. या सर्व संकेतस्थळावर ठराविक प्रकारातील उपलब्ध नोकऱया एकाच ठिकाणी गुगल सर्चवर दिसतील. रोजगार शोधणाऱयाने नोकरीचा प्रकार सर्च केल्यानंतर वरील सर्व संकेतस्थळांवर असणारी रोजगाराच्या संधीची माहिती मिळेल. नोकरीचे ठिकाण, प्रकार, पद यांची माहिती फिल्टर करता येते. ठराविक लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या संकेतस्थळावर जावे लागणार असून यानंतर अर्ज करता येतो.

गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नोकरी ऑनलाईन शोधण्यामध्ये 45 टक्क्यांनी वृद्धी झाली असून भविष्यात ही कायम राहील. यापूर्वी नोकरी शोधण्यासाठीचा अनुभव परिणामकारक नव्हता. याव्यतिरिक्त मोठय़ा कंपन्यांमुळे लहान कंपन्यांतील संधी शोधणे अशक्य होत होते, असे गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी म्हटले.

 

Related posts: