|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » यमकनमर्डीत 12 हजाराची दारू जप्त

यमकनमर्डीत 12 हजाराची दारू जप्त 

प्रतिनिधी / संकेश्वर :

यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथे बेकायदेशीर दारू साठविल्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱयांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळावर धाड टाकून साठवलेली 33 लीटर दारू जप्त केली. याप्रकरणी प्रकाश बरगली याला ताब्यात घेण्यात आले आहे. यमकनमर्डी येथे प्रकाश बरगली हा बेकायदेशीर दारू विकत होता. त्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱयांना मिळाली. अधिकाऱयांनी घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे त्यांना प्रकाशच्या घरात 33 लीटर दारू सापडली. त्याची अंदाजे किंमत 12 हजार रुपये इतकी होते. यावेळी अधिकाऱयांनी दारूसह संशयित प्रकाशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सदर कारवाईत अबकारी खात्याचे पीएसआय डी. एन. हणमंतप्पा, के. डी. गारडे, आर. डी. मदीहळ्ळी, उमेश कोळी, शिवाजी तळवार यांचा सहभाग होता.