|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘प्रादेशिक आराखडा 2021’नावाखाली राजकारण्यांकडून गोव्याची लूट

‘प्रादेशिक आराखडा 2021’नावाखाली राजकारण्यांकडून गोव्याची लूट 

प्रतिनिधी /मडगाव :

प्रादेशिक आराखडा 2021 च्या नावाखाली गोव्याची राजकारण्यांकडून लूट सुरू आहे. गोव्यातील डोंगर, नदी किनारे, शेती-बागायती, मोकळय़ा जागा यांचे मोठय़ा प्रमाणात रूपांतर (सेटलमेंट झोन) करण्यात आले असून अशा प्रकारात गुंतलेल्या राजकारण्यांचा उद्या शुक्रवार दि. 27 रोजी मडगावच्या लोहिया मैदानावर भांडा फोड केला जाणार असल्याची माहिती ‘गोंयचो आवाज’ या संघटनेने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

प्रादेशिक आराखडा 2021 हा केवळ बडय़ा बिल्डरांचे हित जपण्यासाठी मार्गी लावण्यासाठी सद्या सरकारची धडपड सुरू आहे. पण, कोणत्याही परिस्थिती हा डाव साध्य होऊ दिला जाणार नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गोव्याच्या भावी पिढीसाठी कोणतीच जागा शिल्लक रहाणार नाही अशा पद्धतीनेच जमिनीचे रूपांतर करण्याचा सपाटा सद्या लावण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

गोव्यात विद्यमान स्थितीत सुमारे एक लाख फ्लॅट बांधून विक्रीस उपलब्ध आहेत. पण, या फ्लॅटांना ग्राहक नाही. अशा परिस्थिती आणखीन भू-रूपांतर का केले जाते असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. प्रादेशिक आराखडा 2021ला हरकत घेणारी 16 हजार निवेदने (तक्रारी) मुख्य नगर नियोजकांच्या कार्यालयात पडून आहे. या निवेदनाना मुख्य नगर नियोजकांनी हात सुद्धा लावलेला नाही अशी माहिती अभिजीत प्रभुदेसाई यांनी दिली.

सरकारने प्रादेशिक आराखडा 2021 त्वरित रद्द करावा तसेच कोणत्याही प्रकारचे भू-रूपांतर करू नये, नवीन प्रकल्प उभारू नये. केवळ एखादी फॅमिली घर बांधत असेल तर तसेच शाळा व हॉस्पिटल्स यांच्या बांधकामाला आडकाठी असू नये असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

सभेला राजकारण्यांना आमंत्रण

दरम्यान, मडगावच्या लोहिया मैदानावर उद्या शुक्रवारी आयोजित केलेल्या जागृती सभेत गोंयचो आवाज तर्फे जबरदस्त शक्ती प्रदर्शन घडवून आणले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. या सभेतूनच ‘गोंयकारपण’ काय ते दाखवून देऊ असे गोंयचो आवाज निमंत्रक व्हिरितांव फर्नांडिस म्हणाले.

Related posts: