|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक

अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक 

प्रतिनिधी /सातारा :

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कलावंत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांची प्राणज्योत आज मालवली. सयाजी शिंदे यांच्या सातारा शाहूपुरी येथील राहत्या घरी त्यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. कामथी परिसरासह चित्रपट क्षेत्रातील कलावंतांमध्ये त्या माई म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचे माहेर हे भोर परिसरातील वीर धरणानजिक असलेले हरगुडे हे गाव होते. आज त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मूळ गावी वेळेकामथी पंचक्रोशीवर शोककळा पसरली. अभिनेते सयाजी शिंदे चित्रिकरणाच्या निमित्ताने हैद्राबादमध्ये होते. आईच्या निधनाचे वृत्त त्यांना कळताच ते तातडीने विमानाने सातारला येण्यासाठी रवाना झाले होते. सायंकाळी 7 च्या सुमारास ते साताऱयात आले. त्यांच्या निवासस्थानी त्यांचे साताऱयातील नाटय़क्षेत्रातील मित्रपरिवार तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत तंत्रज्ञ तसेच चाहत्यांनी गर्दी केली होती. रात्री 8 च्या सुमारास माहुली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.