|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार

मोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार 

ऑनलाईन टीम / वुहान (चीन) :

पंतप्रधान नरेंद मोदी गुरूवारी रात्री चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वुहान शहरात पोहचले. नरेंद मोदी हे चीनच्या दोन दिवशीय दाऱयावर आहेत. 24 तासात सहा वेळा मोदी-जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहेत.

मोदी व जिनपिंग यांच्याच होणाऱया बैठकींमधील दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये दोन्ही देशातील सहा-सहा सदस्यांचे शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. शुक्रवारी या दोन्ही बैठका पार पडणार आहेत. यातील पहिली भेट ही हुवई प्रॉर्विस म्युझियममध्ये, तर दुसरी बैठक इस्ट लेक किनाऱयाच्या गेस्ट हाऊसमध्ये होणार आहे. यानंतर रात्री जेवणाच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतंकवाद, सीमा वाद असे काही मुद्देही यामध्ये असतील. या अनौपचारिक संवादादरम्यान कुठल्याही करारावर हस्ताक्षर होणार नाही. शनिवारी मोदी व जिनपिंग यांच्यात 3 बैठका होणार आहेत. चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास गुजराती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी जेवणानंतर मोदी वुहानमधून परत येतील. मोदी-जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनी मीडिया अतिशय सक्रियता दाखवते आहे. मोदी व जिनपिंग यांची भेट लॅण्डमार्क भेट असल्याचे चीनी मीडियाचे म्हणने असून ही भेट त्यांना 30 वर्षांआधी झालेल्या डांग शाओपिंग व राजीव गांधी यांच्या भेटीची आठवण करून देते आहे.