|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डायना ‘विश्वसुंदरी’ कशी ? विप्लव देव यांचा प्रश्न

डायना ‘विश्वसुंदरी’ कशी ? विप्लव देव यांचा प्रश्न 

ऑनलाईन टीम / आगरताळा :

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव हे त्यांच्या कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे अधिक चर्चेत आहेत. देव यांनी महाभारतारच्या काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी विश्वसुंदरी डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘विश्वसुंदरी’ डायना हेडनचा निकाल हा ‘फिक्स’ होता, असे म्हणत एका नवीन वादाला तोंड दिले आहे.

ते म्हणाले, आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणे मानतो. ऐश्वर्या राय भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करते. ऐश्वर्या विश्वसुंदरी बनली ते योग्य आहे, पण 21 वर्षापूर्वी डायना हेडन कशी काय विश्वसुंदरी बनली, हे समजण्या पलिकडे आहे. पाच वर्षानंतर भारतात एकही सौंदर्यवती का तयार झाली नाही ? कारण माफियांनी भारताच्या मार्केटवर कब्जा केला आहे, असे विप्लव देव म्हणाले.

कॉस्मेटिक माफियांची भारतावर नजर आहे. सलग पाच वर्ष आम्ही ‘मिस वर्ल्ड’ किंवा ‘मिस युनिव्हर्स’ किताब जिंकले. ज्यांनी ज्यांनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, त्यांनी त्यांनी किताब पटकावले. डायना हेडनही जिंकली. मात्र खरेच ती किताबास पात्र होती का ? असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला.