|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » पुरुषांच्या तुलनेत महिलांना 16 टक्के वेतन कमी

पुरुषांच्या तुलनेत महिलांना 16 टक्के वेतन कमी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारतात अजूनही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळत आहे. भारतात  महिलांना पुरुष सहकाऱयाच्या तुलनेत सरासरी 16.1 टक्के कमी वेतन देण्यात येते.  आंतरराष्ट्रीय पातळीवर साधारण हेच प्रमाण आहे असे कॉर्न फेरी अहवालात म्हणण्यात आले.

कॉर्न फेरी जेन्डर पे इन्डेक्समध्ये सर्वे करण्यासाठी जगभरातील 53 देशांतील 14,284 कंपन्यांतील 1.23 कोटी कर्मचाऱयांना सहभागी करण्यात आले होते.  आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिल्यांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी 16.1 टक्के कमी वेतन आहे. मात्र निवडक क्षेत्रातील काही कंपन्या, काही रोजगार पातळीमध्ये ही असमानता घटत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही कंपन्यांचा विचार करता ही वेतन असमानता 1.5 टक्क्यांपर्यंत कमी आहे. एकाच कंपनीमध्ये समान पातळीवर काम करताना काही कंपन्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या वेतनामध्ये 0.5 टक्क्यांचा फरक आहे. मात्र भारतात अलग अलग कंपन्यांमध्ये एकाच नोकरी करताना हे अंतर 4 टक्के आहे. कंपनी आणि एकाच स्तरातील नोकरीमध्ये मिळणाऱया वेतनातील अंतर 0.4 टक्के आहे. एकाच कंपनीमध्ये एकाचे पातळीवर काम करणाऱया पुरुष आणि महिलेच्या वेतनामध्ये 0.2 टक्क्यांचे अंतर आहे.

सध्या काही कंपन्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अजूनही महिलांना कमी वेतन देण्यात येते. मात्र आपण महिला आणि पुरुषांच्या बाबतीत एकाच नोकरीचा विचार केल्यास हे अंतर कमी आहे असे कॉर्न फेरीचे बॉब वेसेलकॅम्पर यांनी सांगितले. भारतापेक्षा चीनमध्ये वेतनाबाबत भेदभाव करण्याचे प्रमाण कमी आहे. चीनमध्ये हे प्रमाण 12.1 टक्के असून ब्राझीलमध्ये 26.2 टक्के, फ्रान्समध्ये 14.1 टक्के, जर्मनीमध्ये 16.8 टक्के, ब्रिटन 23.8 टक्के आणि अमेरिकेत 17.6 टक्के आहे.

वेतनामध्ये अजूनही भेदभाव होणे ही गंभीर बाब आहे. मात्र महिलांमध्ये कौशल्याचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आल्यास हे प्रमाण घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Related posts: