|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चित्रांमधून घडविली ऐतिहासिक वास्तूंची सफर

चित्रांमधून घडविली ऐतिहासिक वास्तूंची सफर 

बेळगाव / प्रतिनिधी :

चित्रकार संतोष मल्लोळी यांच्या शॅडो या चित्रांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. फोटोग्राफर एम. बी. गौडा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात 20 हून चित्रे मांडण्यात आली आहेत. ऐतिहासिक वास्तूंची पडझड होत असल्याने त्या जतन करून ठेवण्यासाठी संतोष यांचा हा एक प्रयत्न आहे.

या प्रदर्शनात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, केरळ येथील प्रसिद्ध मंदिरांची चित्रे मांडण्यात आली आहेत. चित्राला जर शॅडो नसेल तर चित्र अपूर्ण असते. त्यामुळे संतोष यांनी शॅडो आपल्या चित्रांतून सुंदररीत्या दाखवून दिल्या आहेत. या चित्रांची खासियत म्हणजे शीतरंगांचा वापर करण्यात आला आहे. कुठेही भडक छटा वापरण्यात आलेली नाही.

उद्घाटन समारंभाला चित्रकार दिलीपकुमार काळे, चित्रकार आर. ए. देवर्षी, निवृत्त मुख्याध्यापक एम. एस. मल्लोळी यासह रसिक उपस्थित होते. हे प्रदर्शन सोमवार दि. 30 पर्यंत सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत गोवावेस येथील महावीर आर्ट गॅलरी येथे खुले असणार आहे..