|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » चाळीसगावाजवळ बस झाडावर धडकली,16प्रवाशी जखमी

चाळीसगावाजवळ बस झाडावर धडकली,16प्रवाशी जखमी 

ऑनलाईन टीम / चाळीसगाव :

औरंगाबादहून शिंदखेडय़ाकडे जाणाऱया बसचा आज सकाळी सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने 16 प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

बस क्रमांक एमएच-40, एन.9907 ही औरंगाबादहून शिंदखेडय़ाकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211वर चाळीसगावजवळ ती एका झाडावर धडकली. झाडाची फांदी बसच्या आत घुसल्याने 16 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. प्रवाशांवर येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. बस चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

 

Related posts: