|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » आशियाई बॅडमिंटनध्ये तेई ,मोमोटा अजिंक्य

आशियाई बॅडमिंटनध्ये तेई ,मोमोटा अजिंक्य 

वृत्तसंस्था /वुहान (चीन) :

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत चिनी तैपेईच्या तेई तेजू यिंग व जपानच्या केंटा मोमोटा यांनी जेतेपदाला गवसणी घातली. रविवारी झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत तेईने चीनच्या शेई युफेईला तर पुरुषांच्या अंतिम लढतीत मोमोटाने चीनच्या चेन लाँगला नमवले.

रविवारी वुहान स्पोर्ट्स कॉप्लेक्सवर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत अपेक्षेप्रमाणे अग्रमानांकित तेई तेजू यिंगचे वर्चस्व राहिले. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया तेईने शेवटपर्यंत शेईला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा सामना तेईने 21-19, 22-20 असा जिंकत जेतेपद पटकावले. चीनच्या शेई युफेईला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले.

पुरुषांच्या अंतिम लढतीत जपानचा युवा स्टार केंटा मोमोटाने चीनच्या बलाढय़ चेन लाँगला दणका दिला. मोमोटाने लाँगला 21-17, 21-13 असे पराभूत केले. विशेष म्हणजे, मोमोटाने उपांत्य फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन मलेशियन ली चोंग वेईला नमवत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतही मोमोटाने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन साकारत जेतेपद मिळवले. चीनच्या चेन लाँगला तर भारताच्या प्रणॉयला कांस्यपदक मिळाले.

Related posts: