|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » सुसाट फॉर्च्यूनर हॉटेलमध्ये घुसली, कामगाराचा मृत्यू

सुसाट फॉर्च्यूनर हॉटेलमध्ये घुसली, कामगाराचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

सुसार फॉर्च्यूनर हॉटेलमध्ये घुसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.तर दोन जण जखमी झाले आहेत. सांगवीतील फेमस चौकात भरदुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दुपारी एकच्या सुमारास फॉर्च्युनर कार सुसाट वेगाने आली. मग आहे त्याच वेगाने ती सरळ हॉटेलमध्ये घुसली.पापणी लवण्यापूर्वीच हा अपघात झाला. कोणाला क्षणभर काय झालंय हेच कळलं नाही.कार थेट सुसाट येऊन आत घुसल्याने, हॉटेलमधील दोघांसह ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी कोणाची, चालक कोण, याबाबतची माहिती पोलिस मिळवत आहेत.

 

 

 

 

Related posts: