|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » महापालिकेच्या आवारातील खडय़ात पडून दोघांचा मृत्यू

महापालिकेच्या आवारातील खडय़ात पडून दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

महापालिकेच्या शाळेच्या आवारातील खडय़ात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना येरवडय़ात घडली आहे. मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात असलेल्या खडय़ातील साचलेल्या पाण्यात पडल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे रूद्र रूपेश चव्हाण आणि रूद्र दत्ता भजुबळ अशी आहेत. काल रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील लक्ष्मीनगर येथे मातोश्री इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या वर्गखोल्यांचे काम चालू असल्याने आवारात मोठे खड्डे खणून ठेवले आहेत. काल सुट्टीचा दिवस असल्याने रूद्र चव्हाण आणि रूद्र भुजबळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी गेट खालून शाळेत आले. क्रिकेट खेळताना बॉल खड्डय़ातील पाण्यात पडल्याने तो काढताना मुले पाण्यात पडल्याचा अंदाज येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या खड्डय़ात ही दोन्ही मुले बुडाली तो खड्डा सुमारे दहा फूट खोल होता. त्यात सुमारे सहा फूट खोल सांडपाणी जमा होते. दरम्यान दोघेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. दोघांच्याही दुर्दैवी मृत्यूमुळे रामनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

Related posts: