|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीर खोऱयात ‘ब्लॅक कॅट’ कमांडो होणार तैनात

काश्मीर खोऱयात ‘ब्लॅक कॅट’ कमांडो होणार तैनात 

 नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

देशाचे सर्वात अत्याधुनिक दहशतवादविरोधी दल एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) च्या ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंना लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केले जाणार आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांना मदत व्हावी याकरता या कमांडोंना तेथे तैनात केले जाईल. सैन्य, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांसोबत एनएसजीच्या सहभागाबद्दलच्या प्रस्तावावर गृह मंत्रालयाकडून सध्या विचार सुरू आहे.

एनएसजीला काश्मीरमध्ये तैनात करण्याची योजना आखली जात आहे. या कमांडोंना दहशतवाद तसेच देशांतर्गत उग्रवादी कारवायांना तेंड देण्यासाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

या प्रस्तावावर काम सुरू असून यावर लवकरच आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. एनसएजी कमांडो काश्मीरात तैनात करण्याची ही पहिली वेळ नसेल. या अगोदर देखील या कमांडोंना काश्मीर खोऱयात तैनात करण्यात आले होते अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी दिली.

सैन्याच्या भूमिकेत वाढ

दहशतवादाच्या वातावरणात शस्त्रास्त्रांचा अचूक वापर करण्यास एनएसजी कमांडो तरबेज असतात. हे कमांडो सैन्यमोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावू शकत असल्याने त्यांना समाजकंटकांकडून दहशतवाद्यांना सहाय्य होण्याच्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकते. याचबरोबर सरकार काश्मीरातील सैन्याची भूमिका वाढविण्यावर देखील विचार करत आहे.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रs

काश्मीरमध्ये मोठय़ा संख्येत सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी मोहिमा राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच तेथे एनएसजी कमांडो तैनात करण्याची योजना आखली जात आहे. सामान्यपणे एका छोटय़ा एनएसजी पथकात 5 कमांडो असतात, तसेच यात एक बॉम्बतज्ञ देखील असतो. या कमांडोंकडे हलके आणि मजबूत हेकलर तसेच एमपी5 सबमशीनगन, स्नायपर रायफल, रडार, सी-4 एक्स्प्लोजिव्ह देखील असते.