|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडण्याच्या मार्गावर

जिल्हय़ातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडण्याच्या मार्गावर 

राजेंद्र शिंदे / चिपळूण

 कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या अनेक वर्षापासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वनविभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात ‘व्हर्ल्चर रेस्टॉरंट’ बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपाहारगृहे बंदच पडली आहेत. राज्यात नामशेष होणाऱया पक्ष्यांच्या यादीत समावेश असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्थापन झालेली ही उपहारगृहांची ही योजना खाद्याची कमतरता आणि जागेच्या अडचणीमुळे गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.

  गेल्या काही वर्षांपासून कोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धनाबरोबरच त्यासाठीची पूरक वातावरण निर्मिती आणि डायक्लोफेनॅक बंदी अंमलबजावणीच्यादृष्टीने वनविभाग काम करीत आहे. जिल्हय़ात यापूर्वी बहुतांशी भागात गिधाडांचा वावर होता. मात्र 1990 पासून त्यांच्या संख्येत अचानकपणे घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे कोकणातील संपूर्ण परिसराचे शास्त्राrयदृष्टय़ा सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे, एकूण वसाहती, खाद्याची ठिकाणे यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 2002मध्ये सर्वप्रथम आजर्ले येथे पांढऱया पाठीच्या गिधाडांची घरटी आणि पक्षी आढळले. याठिकाणापासून संवर्धन कार्यक्रम राबवण्यास सुरूवात झाल्यावर 2006 पर्यंत जिल्हय़ात 7 घरटी आणि 14 पक्षांची वाढ दिसली. मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ न होता श्रीवर्धन व चिरगांव वसाहती आढळल्या होत्या. यापूर्वी कोकणात यापेक्षाही अधिक गिधाडांच्या वसाहती आढळून आलेल्या आहेत. मात्र जनावरांना झालेली बोटूलिझमची लागण, जनावरे कत्तलखान्यात पाठवण्याचे वाढलेले प्रमाण आणि स्वच्छता अभियानात चकाचक झालेला परिसर, मृत जनावरे जमीनीत पुरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे खाद्याअभावी गिधाडांच्या संख्येला ब्रेक लागला.

जिल्हय़ात तीन उपहारगृहे 

 महाराष्ट्राच्या नामशेष होणाऱया पक्ष्यांच्या यादीत पांढऱया पाठीची लांब चोचीची आणि पांढरी गिधाडेही आहेत. खाद्याचा तुटवडय़ामुळे जिल्हय़ातील गिधाडे रायगड-श्रीवर्धनकडे वळल्याने तेथे त्यांची संख्या अधिक वाढली. त्यामुळे जिल्हय़ात गिधांडांची संख्या वाढण्याच्यादृष्टीने दापोली तालुक्यातील सुकोंडी येथे पहिले उपाहारगृह सुरू केले. त्या पाठोपाठ मंडणगड तालुक्यातील कळकवणे व खेड तालुक्यातील सुमारगड जवळील विहाळी या ठिकाणी उपाहारगृहे सुरू करण्यात आली.

खाद्याचा प्रश्न गंभीर 

गिधाडांसाठीची उपाहारगृहे ही वनविभागाच्या माध्यमातून चालवली जात आहेत. मात्र गेल्या महिन्यांपासून या उपाहारगृहामध्ये गिधाडांसाठी मृत जनावरे खाद्य म्हणून येऊन पडणे बंद झाले आहेत. त्यातच सुकोंडी येथील जागा ही खासगी मालकीची असल्याने तेथे विरोध झाला आहे. तर विहाळी येथे खाद्याचा तुटवडा आहे. त्यामुळे ही दोन्ही उपाहारगृहे सध्या बंदच आहेत. दरम्यान, मंडणगड तालुक्यातील कळकवणे, म्हसळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली या ठिकाणी वन विभागाची उपाहारगृहे असली तरी तेथेही निधीच्या अडचण आणि खाद्याची कमतरता त्यामुळे त्यांनाही घरघर लागली आहे.

 

 पर्यायी जागा शोधण्याचे प्रयत्न-जगताप

  गिधांडांसाठी खाद्याची कमतरता आहे. त्याचा फटका विहाळी येथील उपाहारगृहाला बसला आहे. तर सुकोंडी येथे मृत जनावरांच्या वासामुळे स्थानिक तसेच ती जागा खासगी मालकीची असल्याने जागा मालकाने विरोध केल्यामुळे पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे.