|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही – पंकजा मुंडे

भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही – पंकजा मुंडे 

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :

रमेश कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेले नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या उस्मानाबादमध्ये सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवारी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती. ‘रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांना धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका सोसावा लागणार आहे. कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेले नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही’, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

 

Related posts: