|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » क्षेपणास्त्र तैनातीवर अमेरिकेचा चीनला इशारा

क्षेपणास्त्र तैनातीवर अमेरिकेचा चीनला इशारा 

वॉशिंग्टन :

दक्षिण चीन समुद्रातील स्पार्टली बेटांवर क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात करून चीनने मर्यादाभंग केला आहे. याचे गंभीर परिणाम त्या देशाला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. चीनने तणाव वाढविण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा अमेरिकेलाही कारवाई करावी लागेल, असे वक्तव्य व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने गुरूवारी रात्री केले. चीनने दक्षिण चीन समुद्राचे लष्करीकरण चालविले आहे. 2014 पासून चीनने या समुद्रात कृत्रिम बेटे तयार करून आपली सागरी सीमा वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या समुद्रावर आपला पूर्ण अधिकार प्रस्थापित करण्याचा त्या देशाचा प्रयत्न असून त्यामुळे त्या परिसरातील इतर छोटय़ा देशांना धोका निर्माण झाला आहे. या समुद्रावर या देशांनीही आपला अधिकार सांगितल्याने त्यांचा चीनशी संघर्ष आहे. अमेरिकेनेही आता यात गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरवात केली असून त्यामुळे तो देश चीनला वारंवार इशारे देत आहे. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या वादावर चीनच्या विरोधात निर्णय दिला होता. तरीही त्याच्या वागणुकीत फरक पडलेला नाही.  दक्षिण चीन समुद्रावर एकटय़ा चीनचा अधिकार नाही. तर जपान, फिलिपाईन्स, तैवान, मकाव आदी देशांचाही अधिकार असून तो चीनने मान्य केला पाहिजे अशी या देशांची भूमिका आहे.

 

 

Related posts: