|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » आयर्लंड कसोटी संघाची घोषणा, पोर्टरफिल्ड कर्णधार

आयर्लंड कसोटी संघाची घोषणा, पोर्टरफिल्ड कर्णधार 

वृत्तसंस्था / ंलंडन

पुढील आठवडय़ात आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना मॅलहिडे क्रिकेट क्लबच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी आयर्लंडचे नेतृत्त्व विलियम पोर्टरफिल्डकडे सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या कसोटी क्षेत्रात आयर्लंडचे या सामन्याने पदार्पण होत आहे. या पहिल्या कसोटीसाठी आयर्लंड संघाची भिस्त प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीवर राहिल.

या कसोटीसाठी 14 जणांचा आयर्लंडचा संघ घोषीत करण्यात आला आहे. या संघात ओब्रायन बंधू, बेलबिरेनी, पॉल स्टर्लिंग, फिरकी गोलंदाज जॉर्ज डॉकरेल यांचा समावेश आहे. हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने आयर्लंड संघाला पाकवर दबाव ठेवण्यासाठी आपली वेगवान गोलंदाजी अधिक भक्कम करावी लागेल. जगातील कसोटी क्रिकेट खेळणारा आयर्लंड हा 11 वा देश आहे. गेल्यावर्षी आयसीसीने अफगाण आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी दर्जा बहाल केला. आयसीसीचे आता 12 देश कसोटीसदस्य आहेत.

आयर्लंड संघ-विलियम पोर्टरफिल्ड (कर्णधार), बेलबिरेनी, जॉयसी, केन, मॅकब्रिने, मुर्तेग, केव्हीन ओब्रायन, निल ओब्रायन, रेनकिन, नाथन स्मिथ, स्टर्लिंग, शेनॉन, थॉम्सन आणि विल्सन.

Related posts: