|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा, पाणी उकळून पिण्याचे आवाहन

मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा, पाणी उकळून पिण्याचे आवाहन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुढील सात दिवसांमध्ये मुंबईकरांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई महापालिकेने ही सुचना जारी केली आहे.

घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय 7 मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे. विशेष म्हणजे बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे पालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. तसेच प्रामुख्याने कुर्ला आणि घाटकोपर भागातील नागरिकांनी येत्या 7 तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

 

Related posts: