|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.कर्मचाऱयांच्या बदल्या 11 मे रोजी

जि.प.कर्मचाऱयांच्या बदल्या 11 मे रोजी 

सुमारे 300 कर्मचाऱयांच्या होणार बदल्या

प्रतिनिधी / ओरोस:

कर्मचाऱयांचा बदली हंगाम सुरू झाला असून जि. प. कर्मचाऱयांच्याही शुक्रवारी 11 रोजी जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. जि. प. वर्ग 3 व 4 कर्मचाऱयांच्या 10 टक्के प्रशासकीय, तर 10 टक्के विनंती बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे 300 कर्मचाऱयांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. जि. प. अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी या बदल्या करणार आहेत.

 ग्रामसेवक व आरोग्य विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱयांना 10 टक्के प्रशासकीय बदलीतून सुट देण्यात आली आहे. मात्र, तालुकास्तरावरील 10 टक्के प्रशासकीय व पाच टक्के विनंती बदलीला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने त्यांचाही याप्रक्रियेत समावेश नाही. मात्र, उर्वरित कर्मचाऱयांच्या बदल्या 15 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार समूपदेशन पद्धतीने केल्या जाणार आहेत. शुक्रवारी 11 रोजी एकाच दिवशी या बदल्या करण्यात येणार आहे.

       विभाग                           वेळ

सामान्य प्रशासन विभाग         सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत

वित्त विभाग                    दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत

ग्रामपंचायत विभाग              दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत

कृषी विभाग                    दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत

बांधकाम विभाग                 दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत

पशुसंवर्धन विभाग               दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत

महिला व बालविकास विभाग     दुपारी 3.30 ते सायंकाळी 3.45 वाजेपर्यंत

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग        सायंकाळी 3.45 ते 4.15 वाजेपर्यंत

लघुपाटबंधारे विभाग              सायंकाळी 4.15 ते 4.45 वाजेपर्यंत

आरोग्य विभाग                   सायंकाळी 4.45 ते 5.15 वाजेपर्यंत

शिक्षण विभाग                    सायंकाळी 5.15 ते 5.45 वाजेपर्यंत