|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » शिवसेना निर्णयावर ठाम, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे

शिवसेना निर्णयावर ठाम, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / नाशिक :

शिवसेना निर्णयावर ठाम आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिथे जिंकू, त्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. सीमा भागातील मतदारांनी दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे. सीमा भागात शिवसेना उमेदवार देणार नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत काय घडले ते जनतेने बघितले आहे, त्याबाबत सध्या भाष्य करणार नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

 

Related posts: