|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » उलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये

उलट सुलट नाटकाचा प्रयोग मस्कतमध्ये 

शेतकऱयांच्या प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱया आणि शेतकऱयांच्या व्यथा मांडणाऱया उलट-सुलट या नाटकाला बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  ‘उलट सुलट’ नाटकाचा प्रयोग 10 मे रोजी मस्कतमध्ये होणार आहे.

सोलापुरमधल्या बार्शी इथे भगवंत महोत्सवात या नाटकाला दहा ते बारा हजार प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेतकरी प्रश्नावर विचार करायला लावणारे हे नाटक हजारो बार्शीकरांनी शांतपणे पाहत वेगळीच शिस्त दाखवून दिली. ऐश्वर्या, सुयोग निर्मित किरण माने लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि मकरंद अनासपुरे अभिनित या नाटकाला प्रत्यक्ष शेतकऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या व्यथेला वाचा फोडली अशी सार्वत्रिक भावना प्रेक्षकांच्या मनात आहे. त्याचमुळे केवळ माऊथ पब्लिसिटीवर या नाटकाला राज्याच्या कानाकोपऱयात हजारोंची गर्दी जमत आहे. नाटकातल्या प्रसंगांशी समरसून जात हेलावून जाणारा प्रेक्षक वर्ग हे चित्र गावोगाव दिसत आहे. हे  नाटक या प्रेक्षकांपर्यंत पोहचावे, यासाठी संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण भागांचे व्यापक दौरे निर्मात्यांनी आखले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागांसोबत शहरी भागातही या नाटकाला हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नाना पाटेकर, उदय निरगुडकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये उलट सुलट नाटकाचा सुवर्ण महोत्सवी 50 वा प्रयोग मुंबईत पार पडला. त्यावेळी मान्यवरांनी केलेलं कौतुक या नाटकाला सातासमुद्रापार घेऊन गेले असून 10 मेला नाटकाचा मस्कत येथे प्रयोग होणार आहे.

रसिकप्रेक्षकांची गर्दी कशाला म्हणतात ते ‘उलट सुलट’ नाटकाला पंढरपूर-बार्शी येथे झालेल्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने कळेल. ज्या मायबाप अन्नदात्या प्रेक्षकांसाठी ही कलाकृती निर्माण केली त्यांचा हा प्रतिसाद भारावून टाकणारा असून निर्माता म्हणून बळ देणारा आहे. मकरंद अनासपुरे यांची लोकप्रियता , संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया निर्माते राजेश पाटील यांनी यानिमिताने व्यक्त केली. लवकरच हे नाटक अमफतमहोत्सवी प्रयोग करणार आहे.