|Monday, January 20, 2020
You are here: Home » leadingnews » राहुल गांधींच्या साखरपुडय़ाची अफवा ; आमदार आदिती सिंहांचा खुलासा

राहुल गांधींच्या साखरपुडय़ाची अफवा ; आमदार आदिती सिंहांचा खुलासा 

ऑनलाईन टीम / लखनौ :

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दोघांना ’’तुम्ही लग्न कधी करणार?’’, या प्रश्नाला वारंवार सामोरं जावं लागते. अशातच, राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल गांधी आणि अदिती सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे या दोघांचं लग्न होणार असल्याचा दावा काही जण सोशल मीडियावर करत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, अदिती सिंह आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य दिसत आहेत. ’राहुल गांधींना अखेर जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत’ असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

 

मात्र दुसरीकडे, राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंह यांनी खंडन केलं आहे. याबाबत अदिती सिंह म्हणाल्या आहेत की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे मी प्रचंड हैराण झाले आहे. राहुल गांधी केवळ आमच्या पार्टीचे अध्यक्ष नाहीत, तर माझ्यासाठी ते मोठय़ भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे लग्नासंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे सांगत अदिती सिंह यांनी अफवेबाबत खुलासा केला आहे

 

Related posts: