|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » आजपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद राहणार

आजपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद राहणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त सापडला असून सोमवार मध्यरात्रीपासून हा मार्ग वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र या पर्यायी मार्गावरही पहाटेपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

आनंदनगर जकातनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून ,कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे कोंडीमुळे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. पुढील दोन महिने या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात येणार असून त्यामुळे ठाणे तसेच नवी मुंबईदरम्यानच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

मात्र, या बदलांनंतरही ठरावीक ठिकाणी वाहनांचा लोंढा वाढणार असून तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्मयता आहे. ऐरोली, आनंदनगर पथकर नाके तसेच नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी आणि ठाणे-बेलापूर मार्गाचा काही भाग हे वाहतूक कोंडीचे जंक्शन ठरणार आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तयारी केली असली तरी, सर्वसामान्य तसेच वाहनचालकांनाही या कोंडीसाठी सज्ज राहावे लागणार आहे. या कामामुळे अवजड वाहतूकीचा भार शहरातील अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी तीन विभागांमध्ये वाहतुकीचे नियोजन केले आहे

 

 

 

 

Related posts: